राजमुद्रा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज ५.३० वाजता सुरु होणार आहे. या शपथविधी वेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.. तर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.. अशातच आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे.. तर शिवसेनेकडून भगव्या रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे..या पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाला आहे.. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव नसल्याने महायुतीत बिघडल असल्याचं बोलले जात आहे.. नुकतीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची गुलाबी रंगाची पत्रिका व्हायरल होत आहे यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आहे. तर शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवरती ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव असून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब आहे.. आता यावरून शिवसेना नाराज झाली असून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार का असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेने भगव्या रंगाची पत्रिका छापली आहे.. या पत्रिकेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा उल्लेख केला आहे.. दरम्यान माहितीच्या शपथविधीसाठी केवळ काही तासात शिल्लक राहिले असताना यांना निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत ठिणगी पडली आहे.. आता या निमंत्रण पत्रिके नंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.. कारण त्याचं नाव गायब असल्याचा दिसून आल असून राजकीय वर्तुळात चर्चा असून नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं..मात्र एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत परंतु त्यांची गृहखात्याची मागणी असल्याची माहिती देखील समोर आली आहे..मात्र आता सरकार स्थापनेचा दावा करण्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्याचा सांगण्यात आल आहे.. या पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत