राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे.. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. यामध्ये लाडक्या बहिणींना एकाच वेळी तीन हजार रुपये मिळणार आहेत..हे पैसे मकर संक्रांती पूर्वी मिळतील अशी माहिती समोर आली असून याबाबत अजून सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही..
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहेत.यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले..आता सहाव्या आणि सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणी वाट पाहत बसल्या असताना आता त्यांना दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.
माहिती सरकारच्या शपथविधीसाठी काही अवधी शिल्लक असतानाच लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.. महायुतीला या योजनेचा निवडणुकीत खूप फायदा झाला.. या निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीला भरभरून मतदान केलं.. आता मकर संक्रांती पूर्वी मिळणाऱ्या या हप्त्याने लाडक्या बहिणीची संक्रात आनंद देणारी ठरणार आहे..