राजमुद्रा : महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडत आहे.. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करायचं मुंबईत दाखल झाले आहेत.. या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार आहेत..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर 11 दिवसांनी महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे दाखल केला.. आज शपथविधी सोहळा होऊन महायुतीचे नव सरकार स्थापन केले जाणार आहे..यापूर्वी महायुतीचे तिन्ही नेते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे..या भेटीत खातेवाटप मंत्रिमंडळ अशा काही विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे..
या नव्या सरकारमध्ये आजची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.. तर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे..