राजमुद्रा : महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्यास काही मिनिटांचा अवधी शिल्लक असून महायुतीच्या ग्रँड शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदीं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्दजांची उपस्थिती असणार आहे..महाराष्ट्रात आजपासून ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तर महाविकास आघाडीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला आघाडीचे नेते उपस्थित राहणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे..
विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीय विजय मिळवून राज्यात पुन्हा एकदा माहितीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी या शपथविधीत व्यवस्था करण्यात आली आहे.. या शपथविधीसाठी सर्वजण उत्सुक असून थोड्याच वेळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे..