राजमुद्रा : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर भव्य दिव्य स्वरूपात पार पडला..भाजपचे महाराष्ट्रातील नंबर वनचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे.
या नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लावून राहिल्या असताना आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत.
महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळालं.. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं.यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
या नव्या सरकारच्या भव्य दिव्य ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली.. असा भव्य दिव्य सोहळा पार पडला