राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला..यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान झाले.उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता.
महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.अजित पवार यांनी शपथविधीला सुरुवात करताना म्हटले की,मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की..असं म्हणत त्याने आपला वेगळेपणा सिद्ध केला.. दरम्यान या सोहळ्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्याचे मुख्यमंत्री तसेच उद्योगपती बॉलिवूड स्टार आले होते. तसेच सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर सोबत विधी सोहळा उपस्थित होते..
दरम्यान महायुतीचा हा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा 40000 नगराणीकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा पार पडला.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने घवघवीत यश मिळालं.. भाजप सर्वाधिक पक्ष मोठा ठरला.. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतली..