राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आज महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.. यांच्यासोबतच शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली.
या शपथविधी सर्वांच्या नजरा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लागून राहिल्या होत्या.. त्यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करून शपथ घेतली. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे हे राज्यात उममुख्यमंत्री म्हणून भूमिका पार पाडतील. मात्र एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याचे चर्चा होत होत्या..त्या आता या शपथविधी सोहळ्यामध्ये त्यांच्या देहबोलीवरून ते नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्या देहबोलीमध्ये नेहमीचा उत्साह अजिबात दिसून आला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.तसेच आजच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा बायो देखील बदलण्यात आला आहे. या ट्विटरच्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
महायुतीत सामील झालेल्या अजित पवार यांनी देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे दुसरे नेते ठरले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्री स्वीकारलं होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद (DCM) स्वीकारले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बहुमत मिळवलं.. भाजपला त्यात अधिक जागा मिळाल्या.. महायुतीतील भाजपच हा सर्वात मोठा पक्ष ठरला.. यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली.. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह जेष्ठ नेत्यांनी ही हजेरी लावली.. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागुन राहिल्या होत्या.