राजमुद्रा : महायुती सरकारच्या नव्या सरकारचा शपथविधी आज पार पडला.. या शपथविधी मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.. यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी या महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी जनतेला भरपूर आश्वासने दिली.. आता हीच आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी या सरकारवर येऊन पडली आहे. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीकडून देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असं आश्वस्त केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारची स्थापना झाली आहे. त्यामुळे महायुतीला आता सर्वसामान्य जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं प्रमुख आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन आता या नव्या सरकारला पूर्ण करावं लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतिकडून जनतेवर अधिक आश्वासनाचा पाऊस पडला..विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी नवं सरकार 25 हजार महिलांना पोलीस दलात समाविष्ट करणार असल्याचंदेखील आश्वासन देण्यात आलं होतं. महायुतीचं सरकार राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12 हजार रुपये वर्षभरात देत आहे. पण हीच रक्कम 15 हजार करणार असल्याची घोषणा महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी महायुतीने काय-काय आश्वासने दिली होती, आता त्याची पूर्तता त्यांना लवकरच करावी लागणार आहे..