राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचीं बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद वाट्याला येणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..मात्र या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज एक बैठक पार पडली.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत मंत्रिपदाचा तिढा वाढणार की सुटणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा काल मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.. या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारांना चांगलाच वेग आला आहे.
दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढील आठवड्यात म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्तारामध्ये किती आणि कोणती खाती आपल्या पक्षाला मिळणार यासाठी चर्चा बैठका सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले एकनाथ शिंदे ग्रह खात्यावर आढळून बसले असल्याच्या चर्चांना उधाण आहे.मात्र भाजपने गृह खात्याचा ऐवजी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहीती आहे..आता महायुतीतील पक्षांना कोणती कोणती मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..