राजमुद्रा : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीच्या नव्या सरकारचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला.. या शपथविधी सोहळ्याला विरोधकांनी दांडी मारली यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.. आघाडीच्या नेत्यांच्या मनात आमच्याविषयी राग आहे.. मात्र आम्हाला विकास करायचा आहे.. ते या शपथविधीला उपस्थित राहायला पाहिजे होते मात्र ते राहिले नाहीत यातूनच हेच दिसून येते की त्यांचा संविधानाला विरोध आहे असं आठवले यांनी म्हटलं..
काल नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे..यावर आता केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले.. तब्बल 231 जागा महायुतीने जिंकल्या. भाजपला सर्वाधिक मत मिळालं. त्यामुळे भाजपच्या सर्वात मोठा पक्ष ठरला.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.मात्र तरीदेखील ते उपस्थित राहिले नाहीत.. दरम्यान हिवाळी अधिवेशनासाठी ते गेले असल्याने ते या सोहळ्याला येऊन शकले नसल्याची माहिती समोर आली आहे..