राजमुद्रा : नुकताच महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर दिमाखात पार पडला.. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी शपथ घेतली आहे .. आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.गृह विभागासाठी शिंदे सेना अजूनही आग्रही असल्यामुळे महायुतीत तिढा अजूनही सुटला नाही.. आता ग्रह खात्याऐवजी या तीन खात्यापैकी एकांची निवड शिंदे सेनेला करावी लागणार आहे. त्यामुळे शिंदेला गृह खात्यावर पाणी सोडावं लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
नुकताच महायुतीच्या नेतृत्वाचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. आता मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची खाती महायुतीतील कोणकोणत्या पक्षाकडे असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची खाते वाटपासंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.. आता बसलेले एकनाथ शिंदे खातं सोडण्यास तयार होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात एकूण 43 मंत्रिपद आहेत आणि महायुतीच्या आमदारांचा संख्याबळ 230 इतकी आहे. त्यातही भाजपाकडे 132 आमदारांचे मोठे संख्याबळ आहे. तर राष्ट्रवादीपेक्षा आमच्याकडे अधिक संख्याबळ असल्याची चर्चा शिवसेनेकडून सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गट महत्त्वाच्या खात्यासाठी आग्रही असणार आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी ही रस्सीखेच सुरू आहे..
दरम्यान राष्ट्रवादीच्या मंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत 7 कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्य मंत्र्यांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये छगन भुजबळ. धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे, इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.