राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची लाट पाहायला मिळाली तसेच खानदेशात ही महायुतीची लाट होती.. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला.. हा पराभव आता जिव्हारी लागला असून
खानदेशातील बडा नेता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद वाढणार असल्याचे दिसून येत आहे..त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे..
जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतीच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली.. मिळालेल्या माहितीनुसार ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.त्यांनी अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आगामी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं बळ यानिमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांची ताकद वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे..
विधानसभा निवडणूकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकर रिंगणात होते.. यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली.. या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवून देवकर यांचा पराभव केला.. हा पराभव आता विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे..