राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत जोरदार दिमाखात पार पडला.. या सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश कोर्टाने आयकर विभागाला दिला आहे..कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोर्टाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला असून विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी 5 डिसेंबरला सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
अजित पवार यांच्यावर संबंधित कारवाई 2023 आयकर विभागाने केली होती.त्यावेळी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती. आता या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.