राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.. या सोहळ्यानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला मुंबईचा सुरुवात झाली आहे.. या अधिवेशनात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळबंकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली..
या विधानसभेच्या शपथविधी वेळी आमदार अबू आझमी आणि बापू पठारे वगळता महाविकास आघाडीतील इतर आमदारांनी आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. अबू आजमी हे महाविकास आघाडी सोबत आहे तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.. दरम्यान या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनंतर सोमवारी नऊ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.. या निवडीत कोणाशी वर्णी लागणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या हिवाळी अधिवेशनासाठी कालिदास कोळबंकर यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे. त्यानंतर आज नवनिर्वाचित आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली.. मात्र महाविकास आघाडीच्या त्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही.. तर आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आले. या आघाडी कडून ईव्हीएम वर संशय व्यक्त करण्यात आला. याचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले..