राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी मुंबईत आझाद मैदानावर पार पडला .या शपथविधीनंतर आता अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेली समाजवादी पार्टीने वेगळी वाढ धरण्याची तयारी केली आहे..मित्रपक्ष समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मी मविआसोबत राहणार नाही असं स्पष्ट केलं.आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागणार आहे..
.
महाविकास आघाडीला आमदारांच्या शपथविधी आधी मोठा धक्का बसला आहे. मविआच्या मित्र पक्ष असलेली समाजवादी पार्टी यांनी शिवसेनेचं धर्मांध राजकारण आम्हाला पटत नसल्याचं म्हटलंय. धर्मासंदर्भात, विशिष्ट समाजाबद्दल बोलेल अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. आम्ही एकटेच राहू अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
विधानसभा अधिवेशनात नवनिर्माचित आमदारांनी शपथ घेतली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतली नाही. मविआने आज आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली. मात्र आपण मविआत राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.शिवसेना हा धार्मिक राजकारण करणारा पक्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो आणि ते जर धार्मिक मुद्दे रेटत असतील तर चर्चा कशी होईल. आता काँग्रेस आणि शरद पवारांनी विचार करावा की त्यांनी मविआत रहायचं की नाही. असेही त्यांनी म्हटले आहे..
नव्या सरकारच्या शपथविधीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.. आता या नव्या सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली सुरू केले आहेत.. त्यामुळे कोणकोणत्या पक्षाला कोणती महत्त्वाची खाते मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..