राजमुद्रा : नुकताच महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.. या शपथविधीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. मात्र यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना चांगला वेग आला आहे. मात्र खातेवाटप, मंत्रीपदं आणि पालकमंत्रिपदं यासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गृह खात्यावर अडून बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे भाजप ही ग्रह खाते सोडण्यास तयार नाही. यावरून महायुतीत रुसवे फुगवे सुरू असल्यामुळे या नाराजी नाट्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा त्याग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे…विधान परिषदेचं सभागृह नेतेपद देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे..
महायुती सरकारच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीतील पक्षात कोण कोणती महत्त्वाची खाती आपल्याकडे येणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.. तर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या..त्यांच्या चेहर्यावरील नाराजी लपून राहिलेली नाही.या नाराजीनाट्यानंतर आता महायुती सरकारच्या सूत्रांकडून अशी माहिती समोर आली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे..राज्यात भाजपला पुन्हा ज्यांच्यामुळे सत्तेत एन्ट्री मिळाली, त्या शिंदेंसाठी खुद्द फडणवीस हे मोठा त्याग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रोटोकॉलनुसार विधानभवन आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचं मुख्य नेतेपद हे मुख्यमंत्र्यांकडे असते.पण महायुती सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे.विधान परिषदेचं सभागृह नेतेपद देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं..या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला.. अन भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला असून यामध्ये कोणाकोणाला कोणती खाते मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.