राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आता कालपासून राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे . या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या अधिवेशनात वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या अधिवेशनात आज महाविकास आघाडीचे आमदार शपथ घेत आहेत.. तसेच या अधिवेशनात ईव्हीएम मधील कथीत घोटाळा, आघाडीच्या नेत्यांनी शपथविधी वर टाकलेला बहिष्कार तसेच बेळगाव मधील मराठीची मुस्कटदाबी यावरून वातावरण तापणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान घेऊन आणि जय संविधान म्हणून आमदारकीची शपथ घेतली..
या अधिवेशनासाठी कालिदास कोळबंकर यांना राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.यानंतर आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेत आहे.. यामध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार आज आमदारकीची शपथ घेणार आहेत.
या विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान आणि जय संविधान म्हणून आमदारकीची शपथ घेतली. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेत आहेत.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश लपवण्याचे काम शरद पवार करत आहेत.. आघाडीच्या खोटी मनाला जनतेने नाकारला आहे..दरम्यान लोकसभेत आमचा पराभव झाला. आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. आधी ईव्हीएमवर का आक्षेप घेतला नाही? ईव्हीएमवरून निवडणून येणाऱ्या सर्व आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत असे त्यांनी म्हटले..
महायुती आघाडीच्या विधानसभेतील यशाबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.