राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचा यात दिसून आलं.. नुकताच महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. या महायुतीच्या विजयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीसां विरोधातल्या लढाईत एक पाऊल माघारी घ्यायचं ठरवत थेट राजकीय शत्रुत्व संपवण्याचे संकेत दिले आहेत.. त्यामुळे राजकीय वैर संपवून आता ते एकत्र येणार का? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावरही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.. मात्र आता हे सर्व विसरून पुन्हा एकत्र येण्याची संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल 230 जागा जिंकून सत्तेत धडाक्यात कमबॅक केले होते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्या नेतृत्वाची जादू दाखवत भाजपने लढवलेल्या 149 जागांपैकी तब्बल 132 जागा निवडून महाराष्ट्र भाजपमध्ये आपणच बॉस असल्याचं दाखवून दिले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. या सर्व घडामोडीत महायुतीतीचा पारडं जड असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जुळवून घेण्यात आपलं हित असल्यास अनेक नेत्यांनी ओळखलं आहे.. त्यात आता एकनाथ खडसे यांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे..