राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर भव्य सोहळ्यात पार पडला..राज्यात महायुती सरकार स्थापन झालं. राज्यातील 173 आमदारांनी शपथ देखील घेतली आहे. आज मविआतील आमदार शपथ घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त कधी, याची आता उत्सुकता शिगेला पोचली असताना मंत्रिमंडळाचा विस्तार लांबीवर पडला असल्याची माहिती समोर आली आहे.. यासाठी मंत्र्यांच्या याद्या दिल्ली दरबारी गेल्या असल्यामुळे दिल्लीतील भाजप हायकमांडाच्या मंजुरीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत आहेत.. तर राज्यमंत्री मंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागलेल असताना विशेष अधिवेशनानंतर लगेच विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र राजकीय सूत्रांनुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीत हायकमांडच्या हाती असल्याचे माहिती समोर आली.
त्यानंतर महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापली नावे निश्चित करणे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मंत्रीपद वाटपावर चर्चा होईल. यानंतर दिल्लीकडून मंजुरी येईल.या प्रक्रियेमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होईल, असं दिसून येत आहे.. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपदे आणि कोणला, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपला 22, एकनाथ शिंदे शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे..