राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.राज्यात नवं सरकार स्थापन झालं यानंतर आता. येत्या 12 तारखेपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी केला जाणार आहे. या राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक आमदारांनी अगोदरच लॅबिंग लावलं होतं.. मात्र नुकतचं शिंदेंच्याशिवसेनेचे प्रगती पुस्तक समोर आला आहे.. यामध्ये माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. इच्छुक असलेल्या अकरा आमदारांना संधी मिळणार आहे..
मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचं तसंच इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. या शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री.
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
या पास झालेल्या आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिपद देणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान याच शिवसेनेच्या प्रगती पुस्तकातून माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळणार असल्याचे दिसून येत आहे..संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि सत्तार हे मराठवाड्यातून येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.