धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | महागाईविरोधात चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नियोजित आंदोलन परवानगी नसल्याचे सांगत आज पोलिसांनी उधळून लावले. यावेळी आंदोलनाच्या साहित्यासह आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कुठलेही आंदोलन करण्यास बंदी घातली होती. पर्यायी जागा म्हणून जेलरोड परिसरात परवानगी देण्यात आली आहे. असे असताना आज सकाळी महागाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी आवश्यक साहित्य आंदोलनस्थळी आणल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परवानगी नसताना आपण आंदोलन का करत आहात? असा जाब विचारत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा होताना दिसून येत आहे.