राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.. यावेळी धुळे शहराचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत अहिराणी भाषेत शपथ घेतली आहे. यामुळे खान्देशातील अहिराणी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.. आपल्या बोली भाषेबद्दल नवनिर्वाचित आमदाराचा संवेदनशीलपणा यावेळी दिसून आला.शपथविधीच्या वेळेस विधान भवनात आज ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा घुमला. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणीतून शपथ घेतली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनुप अग्रवाल हे भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदाच निवडून आले आहेत.. त्यांनी एमआयएमचे आमदार फारुख शहा आणि ठाकरे गटाचे अनिल गोटे यांचा पराभव केला.. या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शपथ घेतेवेळी भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या बोलीभाषा असलेल्या अहिराणीत आपल्या आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. राज्यातील 2 कोटी अहिराणी भाषिक तथा खान्देशी नागरिकांकडून या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 106 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली.. पहिल्या दिवशी शपथ दिलेले आमदारांची संख्या पाहता आतापर्यंत बल 279 आमदार शपथ बदल झाले आहेत.. उर्वरित आमदारांचा आज शपथविधी होणार आहे.. दरम्यान काल झालेल्या शपथविधीच्या वेळेस विधान भवनात आज ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा घुमला. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणीतून शपथ घेतली.. त्यांच्या या कृतीचा राज्यातील अहिराणी भाषिकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे..