राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता लवकरच विस्तार होणार असल्याचा समोर आला आहे.. याबाबत काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक तास चर्चा झाली.. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर काही मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे..यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार त्या दिवशी होणार होता.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कमी कालावधीचा असल्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्या दिवशी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी झाला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. . मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये एक तासभर चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली.
दरम्यान दुसरीकडे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे.. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी पहिल्या दोन दिवशी शपथ घेतली असून उर्वरित आमदार आज शपथ घेणार आहेत.हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 7 डिसेंबरला हे अधिवेशन सुरु झालं. तर आज 9 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.. दरम्यान येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.