राजमुद्रा : महायुती सरकारच्या नव्या शपथविधी सोहळ्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. एकवेळ एकच अर्ज आल्यानं पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हे बिनविरोध निवडणून येणार आहेत. त्यांच्या निवडीची आज औपचारिकपणं घोषणा केली जाणार आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळी कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने त्यांची निवड आता निश्चित झाली आहे.विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड झाली. नार्वेकर यांनी मागील युती सरकारमध्येदेखील विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावावर अनिल पाटील यांचं अनुमोदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर आशिष शेलार यांचं अनुमोदन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावावर चंद्रकांत पाटील यांचं अनुमोदन होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
दरम्यान राहुल नार्वेकर हे वकील असून त्याने शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी त्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.2019 च्या निवडणुका पूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटेवर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.. आता यानंतर झालेल्या 2024 च्या निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून ते विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेली महाविकास आघाडी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित आमदार आज शपथ घेणार आहेत.