राजमुद्रा : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सध्या मुंबईत विधानसभेचे कामकाज सुरू आहे. मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरू असून शनिवारी सात डिसेंबर रविवारी आठ डिसेंबर असे दोन दिवसात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला.. आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षांशी निवड केली जाणार आहे. दरम्यान महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते आणि विधानसभा उपाध्यक्षपद विरोधीपक्षाला देण्यात यावे ही मागणी केली आहे..आज शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधीपक्ष नेते पद याबाबत काही निर्णय होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेली महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात संशय व्यक्त करत रिंगणात उतरली आहे.. याची पडसाद आता राज्यभर उमटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. भाजप नेते राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे.. मात्र महाविकास आघाडीने केलेल्या मागणीनुसार विरोधी पक्षाला मिळणार का विधानसभा उपाध्यक्षपद याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्या येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन होणार आहे.. या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान आज या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड केली जाणार आहे. संध्याकाळी चार वाजता राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर शो प्रस्ताव मांडला जाणार आहे… त्यासोबतच आजच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर केला जाईल. यानंतर राष्ट्रगीताने विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा समारोप होणार आहे.