राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. या निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने आता ईव्हीएम वर संशय व्यक्त करत एल्गार पुकारला आहे..महाविकास आघाडीकडून (MVA) ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडीतील ग्रामस्थांना पाठिंबा दिला त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील मविआच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मारकडवाडीतील मतदारांना ईव्हीएम मशीन विषयी शंका होती त्याचा निरसन करण्यासाठी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निश्चित केलं होतं..मात्र प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करून मतदान प्रक्रिया रोखली यानंतर मारकवाडीत वातावरण चांगलेच तापलं.आता मारकवाडीत शरद पवार यांनी भेट देत ग्रामस्थांना दिलासा दिला.. आता आम्ही हा लढा देशभर नेणार.. ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं.. त्यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस नेते राहुल गांधी ही मारवाडी जाणार आहेत.. त्यामुळे मारकडवाडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
माळशिरस मधील मारकडवाडी ईव्हीएम विरोधी लढ्याचं केंद्र बनला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे ईव्हीएम चा विरोधात इथूनच लॉंग मार्च करणार आहे..यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणसिंग सप्रा म्हणाले की, “महाविकास आघाडीकडून राज्यभरात ईव्हीएमच्या विरोधात तीव्र निषेध केला जाईल. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना 9 डिसेंबर रोजी मारकवाडी येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.” राहुल गांधी आज गावात ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याची शक्यता आहे.