राजमुद्रा : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला.. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असून या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेल्या अटीमुळे शिवसेनेच्या आमदारांना मंत्रीपद मिळणं अवघड झाल आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सरकारमध्ये स्वच्छ चरित्राचे आमदार असावेत, तसेच मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त विधान करणारे नकोत, असा फडणवीसांचा आग्रह आहे.. त्यामुळे शिवसेनेच्या पाच जणांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आता कमीच आहे.. त्यामुळे शिवसेनेचा अन्य आमदारांना संधी मिळणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीच्या गेल्या मंत्रिमंडळात 29 मंत्री होते. 14जागा रिक्त होत्या त्यामुळे तेव्हापासून अनेक जण मंत्री पदासाठी इच्छुक होते.. मात्र आता सत्ताधारी आमदारांचा आकडा 234 च्या वर पोहोचल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणा कोणाला संधी द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या निकषानुसार शिवसेनेच्या मंत्रांचा पत्ता कट होणार असल्याचा दिसून येत आहे..
यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत,दीपक केसरकर,अब्दुल सत्तार, संजय राठोड,आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ स्थान देण्याच्या मनस्थिती देवेंद्र फडणवीस नाहीत अशी माहिती समोर आली आहे.या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारित्या 12 डिसेंबरला होणार शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळालं मात्र यामध्ये भाजपच हा सर्वात मोठा पक्ष ठरला.. भाजपकडे 132 आमदारांचा संख्यबळ जास्त असल्याने महायुतीत त्यांचं पारडं जड ठरलं. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. आता सरकारचा चेहराच फडणवीस हेच असल्यामुळे सरकारमध्ये नवे चेहरे आणि निष्कलंक असावीत अशी फडणवीस यांची अट आहे.. त्यामुळे मंत्रिमंडळ स्थान देताना देवेंद्र फडणवीस प्रत्येक आमदाराला पारखून देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.