राजमुद्रा : महायुती सरकारच्या नव्या शपथविधीत मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली..यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस तरुणांच्या रोजगारांसाठी ॲक्शन मोडवर आले आहेत.. राज्यातील तरुणांना नोकरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना राबवण्याची रूपरेषा तयार केली असून दीड लाख नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.. त्यामुळे लवकरच राज्यात दीड लाख रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारची पुढील दिशा कशी असेल तेही स्पष्ट केल आहे.. यासोबतच राज्यात विविध योजना राबवण्यासह तरुणांना सरकारी नोकरी मिळेल असा आश्वासन देखील त्यांनी दिल आहे.. राज्यातील तरुणांसाठी लवकरच दीड लाख रोजगार उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी असे आदेशच त्यांनी दिले आहेत.. त्यामुळे आता तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे..
दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.. यामध्ये कोणाकोणाला संधी मिळणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मंत्रिमंडळात विस्तारात येणाऱ्या आमदारांसाठी अटी घातले आहेत.. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.. दरम्यान सोमवारी त्यांनी घेतलेला तरुणांसाठीचा निर्णय यामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे..
दरम्यान गेल्या आठ महिन्यात मंजूर झालेल्या प्रकल्पामधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे यामधून 1.2 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील असे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांनी सांगितलं..आता यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी असे आदेशच दिले आहेत..त्यामुळे लवकरच सरकारी नोकऱ्या राज्यातील तरुणांसाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आ