राजमुद्रा : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर उत्साहात पार पडला.. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत.. या विस्तारावरून आता राजकारण तापलं असून गृह खात्याचा ट्विसट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केला आहे.. राज्यातील मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत गेली आहे की नाही याबद्दल कल्पना नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले प्रमाणे आता विस्तार हा नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी करावंच लागेल असं त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीमध्ये धुसफुस सुरू असल्याचे बोलत होतं.. महायुतीत आता खाते वाटप कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे ते गृहखात्यासाठी अजूनही आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर सुद्धा संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाबाबत कोणतेही मतभेद नाहीत.बरीच मोठी प्रोसिजर, प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले. कुणाला कुठलं खातं द्यायचं, याबद्दल चर्चा तर करावीच लागणार असे सांगत त्यांनी पत्ता उघड केला आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपचं संख्याबळ पाहता महायुतीत त्यांचं पारडे जरड आहे. गेल्या मंत्रिमंडळात 29 मंत्री होते आता 14 जागा रिक्त होत्या.. तेव्हापासून अनेकजण मंत्री पदासाठी इच्छुक होते मात्र सत्ताधारी आमदारांचा आकडा 234 वर पोहोचल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर मंत्रिमंडळ विस्तारात कोणा कोणाला संधी द्यायची असा पेच निर्माण झाला आहे..
महायुतीला मोठे यश मिळाल्याने मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या पण अधिक असल्याचे त्यांनी सांगितलं.
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेली महाविकास आघाडी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत मैदानात उतरली आहे.. नुकतीच राजाने दिले तर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे महत्त्वपूर्ण बैठक झाली यावरून आता शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी टोला लगावला.. ते म्हणाले, दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी जी बैठक होते ती ईव्हीएम बाबत होत नाहीये तर ती राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठीची बैठक असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.