राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.. मात्र आता त्यांच्या पक्षप्रवेशाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.. त्यामुळे जळगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे..
जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकरा विरोधात प्रवेश बंदीचा फलक देखील लावण्यात आला आहे.. देवकर आणि त्यांच्या समर्थकांना अजितदादा गटात प्रवेश देऊ नये यासाठी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत प्रचार सभेत बोलताना देवकर यांनी अजित पवार यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेचा वापर केला असल्याचा पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला त्यांनी विरोध केला आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे गुलाबराव पाटील रिंगणात होते.. त्यांनी देवकर यांचा लाखाच्यावर मत घेत पराभव केला.. या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडत देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं मात्र आता त्यांच्या पक्षप्रवेशालाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तीव्र विरोध होत आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे.. अजित पवार गटामध्येयेण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना संधी मिळणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..