राजमुद्रा : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोनच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली असून या सरकारमध्ये कोणा कोणाला मंत्री पद मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.. नुकतीच महायुतीच्या शिंदेंच्या शिवसेनेला 13 मंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. याबाबत दिल्लीत शिक्कामोर्तब झाल असून या शिंदे सरकारमध्ये गुलाबराव पाटील,उदय सामंत, दादा भुसे,शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना शिंदेंच्या शिवसेनेचे तेरा मंत्री शपथ घेणार आहेत..दरम्यान भरत गोगावले यांचा शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार असल्याच्या चर्चा होत होत्या.. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते मंत्री होऊ शकलें नाहीत.. आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.. येत्या दोनच दिवसात फडणवीस सरकारचा शपथविधी होणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेल्या मंत्र्याची नावं
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल
दरम्यान हिवाळी अधिवेशनापूर्वी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही बोलले जात आहे.. या मंत्रिमंडळात आता नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणारा असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाठ यांच्याबरोबरच इतर नावांची चर्चा आहे. त्यामुळे या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.