राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला.. हा पराभव आघाडीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्यानंतर आता खासदारांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे.. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी “मिशन लोटस “राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे काही खासदार संपर्कात असल्यासही दावा भाजपने केला आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेत भाजपला यश मिळालं नव्हतं त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. यानंतर आता आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार, आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.. आता या भाजपच्यां मिशन लोटस वरून शिवसेना ठाकरेंचें नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही हल्लाबोल चढवला आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आघाडीतील नेते फुटणार असल्याच बोलले जात आहे.. ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यामुळेच भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे असं दिसून येत आहे..दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपने महत्त्वाची पदे स्वतःकडे ठेवण्याची रणनीती वेगाने सुरू केली आहे.. भाजपच बहुमत अधिक असल्याने मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. तसेच महत्त्वाच्या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डिंगही लावली आहे..