राजमुद्रा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार स्थापन होऊन आठवडा झाला तरी खाते वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या महायुती सरकारच्या घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतिक्षा लागली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री दीड वाजता खलबते झाली.. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही.. त्यामुळे आता महायुतीचा मंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते पुन्हा एकदा आज दुपारी दिल्ली दरबारी रवाना होणार आहेत. आता यावर तोडगा निघणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचं पारडं जड असल्याने मोठी खाती मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे.. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने ही दावा अजूनही सोडला नाही.. गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आता तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत..ही भेट सद्धिच्छा भेट असणार आहे, असे सांगितले जात असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,अशी माहिती समोर आली आहे..
या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत बंगल्यावर बैठक झाली. रात्री दिड वाजता एक तास खातेवाटपा संदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नाही. तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही दुसरीकडे बोलले जात आहे.. त्यामुळे दिल्ली दरबारी तर हा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.