राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीने मोठ्या संख्येने मतदान केल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला. गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत पदभार स्वीकारला.. या महायुती सरकारला सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या लाडक्या बहिणींची डोकेदुखी आता वाढणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज दाखल करण्यात आले होते..त्या अर्जांची आता पडताळणी सुरू करण्यात आली असून हमीपत्रांच्या पडताळणीवर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे..त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेन्शन वाढला आहे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात असं होतं की, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, कुटुंबातील सदस्य आयकर भरत नाहीत,, चार चाकी नाही,, पाच एकर पेक्षा जमीन नाही, तसेच शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही असं लिहिलं होतं.. या हमी पत्राची आता पडताळणी सुरू झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेन्शन वाढला आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर चे पैसे खात्यात जमा करण्यात आले होते.आता डिसेंबर चे पैसे कधी येणार याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या असताना हमीपत्र आता त्यांची डोकेदुखी वाढवणार आहे..
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले.या योजनेचे अंमलबजावणी करत जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा ही करण्यात आले.. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर आणण्यात ही योजना गेम चेंजर ठरली.. सत्तेत आल्यानंतर पंधराशे ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन या सरकारने केले.. मात्र आता होत असलेल्या अर्जांच्या पडताळणीनुसार महिलांची धाकधूक वाढली आहे..