राजमुद्रा : नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता मराठवाड्यातील बोर्डाच्या एका निर्णयाने वातावरण चांगलेच तापलं आहे..लातूर जिल्ह्यातील तळेगाव या गावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ न्यायधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्या जमिनीवर दावा केला असून ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत.. गेल्या पिढ्यानपिढ्या या जमिनीवर कसून मेहनत करून या शेतकऱ्यांनी आपला संसार आणि जबाबदाऱ्या पार पडल्या.. आता त्यांच्या हक्काचे असणाऱ्या जमिनीवर बोर्डाकडून दावा केला जात असल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणं आहे..या शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर पटेल सय्यद इरफान यांनी दावा केला आहे. या प्रकरणात वक्फ बोर्डाकडे शेतकऱ्यांच्या तीन तारखाही झाल्या आहेत. या खटल्यात १०३ शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनालाही पार्टी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
या तळेगावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या बोर्डाच्या आहेत..विशेष म्हणजे या शेतकऱ्यांकडे शेतीची मालकी, सातबारा अशी सर्व कागदपत्रे आहेत. वक्फ बोर्ड मात्र नोटीस पाठवत त्या जमिनीखाली करण्याचा आदेश दिला असल्यास एका शेतकऱ्यांना सांगितलं.
या गावातील तीन पिढ्यांनी या शेतीवर कसून मेहनत करत शेती केली.१९५४, ५५ आणि ५६ च्या काळात तळेगावमधील शेतकऱ्यांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत.. मात्र आता त्यांच्या जमिनीवर दावा केला जात असल्याने त्यांना नोटीसी पाठवण्यात आले आहेत.. त्यामुळे ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे… या जमिनी विकत घेतल्याची सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांकडे आहे.त्यामुळे त्यां जमिनी आमच्याच आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
या गावातील शेतकऱ्यांना ही नोटीस जून महिन्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसा जमा करुन वकील लावला. त्याच्या दोन, तीन तारखा झाल्या. मात्र आता त्यांना नोटीसी पाठवण्यात आल्यात..आता यासंदर्भातील बातमी आल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे..