राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला तरी खातेवाटप अजून झालेले नाही.. या खाते वाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.. अशातच येत्या दोन दिवसात फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा पार पडली. या बैठकीस खाते वाटपावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला कोणतं खातं मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागला असताना भाजप आणि शिवसेना मध्ये गृह खात्यावरून तिढा आहे.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे बहुमत अधिक असल्याने भाजप ही दावा सोडण्यास तयार नाही.. दरम्यान आज माहितीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हा तिला सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी गेले आहेत.. वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी तर हा खाते वाटपाचा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
दरम्यान नुकतीच महायुतीच्या शिंदेंच्या शिवसेनेला 13 मंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. याबाबत दिल्लीत शिक्कामोर्तब झाल असून या शिंदे सरकारमध्ये गुलाबराव पाटील,उदय सामंत, दादा भुसे,शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. आता या खाते व्हाट्सअप मध्ये माहितीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कोणती खाते मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.. दरम्यान सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत खाते वटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली..
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच हा सर्वात मोठा पक्ष ठरला.. मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारच्यां मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ॲक्शन मोडवर आले आहेत..