राजमुद्रा : राज्यात महायुती सरकार सतेत येण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सर्वात लोकप्रिय ठरली. मात्र या योजनेत बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर येत आहे. त्यासंदर्भात आता महायुती सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी या योजनेत कोणताही बदल झालेला नाही..असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले.या योजनेचे अंमलबजावणी करत जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा ही करण्यात आले.. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर आणण्यात ही योजना गेम चेंजर ठरली.. सत्तेत आल्यानंतर पंधराशे ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन या सरकारने केले.. मात्र या योजनेत बदल होणार असल्याचे बोलले जात आहे..याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. या योजनेत शासनाकडून पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे आता महायुतीचे सरकार आल्यामुळे या योजनेची रक्कम २१०० रुपये होण्याची शक्यता आहे.