राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडलेला आहे.. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला असताना राष्ट्रवादीचे अजितदादा आमदारांना मंत्रीपदाची संधी देताना धक्का तंत्राचा वापर करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे..त्यामुळे जेष्ठ नेत्यांचा पत्ता कट होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काल दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.. या बैठकीत तब्बल दोन तास चर्चा झाली असून कोणा कोणाला खाती मिळणार? मंत्रिपद मिळणार? याची चर्चा झाली..यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..
राष्ट्रवादीचे अजित पवार गटात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे अनुभवी काँग्रेसचे दिग्दज नेते आहेत. त्यांच्याकडे दीर्घकाळ मंत्री पद भूषवण्याचा अनुभव आहे.. मात्र या ज्येष्ठ नेत्यांना मंत्री पदाची संधी मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.. मंत्रीपदाची संधी देताना अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहरांना संधी देऊ शकतात.. यासाठी चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकित अजित पवार यांनी स्वबळावर पक्षाचे 41 आमदार निवडून आले आहेत..
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41, भाजपला 132 जागा यामध्ये अधिक बहुमत भाजपला मिळालं.. मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून चांगले खात्याची मागणी होणे अपेक्षित आहे..