राजमुद्रा : नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.. या शपथविधीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून अनेक जणांनी फिल्डिंग लावली आहे. अशातच अडीच वर्षांमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेले शिवसेना आमदार भरत गोगावले यांना आता तरी पण पद मिळेल अशी आशा आहे.. मात्र या मंत्रिमंडळात पद मिळो ना मिळो महाराष्ट्राला झटका देण्याचा निर्णय घेतला आहे.. एसटीच्या तिकिटात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्याकडे काही महिन्यापूर्वीच एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद आले.. मात्र महायुती सरकारमध्ये मंत्री पद मिळावे यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली असताना पद मिळेल का नाही याची आशा धरून राहिली आहे.. तर दुसरीकडे या अध्यक्षपदावर असल्यामुळे त्यांनी आता एसटीची तिकीट भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याचे सांगितले आहे.. एसटीने दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांना सेवा दिली जात आहे.. आता दरात वाढ झाल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे.
मंत्रीपदच्या आशेवर अडीच वर्षे काढलेले शिवसेना आमदार भरत गोगावले यांची यंदा तरी इच्छा पूर्ण होणार का? याची रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त आहे.. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या अखेरच्या काळात गोगावले यांची एसटी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.. त्यानंतर आता मंत्रिमंडळात पद मिळावं याकडे त्यांची आस लागली आहे.. दुसरीकडे त्यांनी घेतलेला एसटी बाबतचा निर्णय यामध्ये तिकीट दरात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव,, पाठवला असला तरी प्रवाशांची सुरक्षीतता हेच एसटीचा अंतिम ध्येय राहील असं ही त्यांनी म्हटलं आहे.