राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी भाजप महायुतींन महाराष्ट्रात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “जाहीर केल्याने या निवडणुकीत याचा मोठा फायदा झाला.. राज्यात महायुती सरकार आणण्यात ही योजना गेमचेंजर ठरली.. हाच मास्टर स्ट्रोक आता आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीत वापरणार आहेत. दिल्लीतील माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिला सन्मान निधी अंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला एक हजार रुपये येतील असं त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेतुन महिलांच्या खात्यात महिन्याला एक हजार रुपये टाकणार आहेत.. इतकेच नाही तरी या निवडणुकीत तर महिलांना एक हजार रुपये ऐवजी 2100 देण्याची मोठी घोषणा ही केली आहे. यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे..भाजपा महायुतीने महाराष्ट्रात लागू केलेली योजना दिल्लीत राबवणार असले तरी योजनेचा इम्पॅक्ट दिल्लीत दिसून येणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..
आज झालेल्या दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी असं म्हटलं की, आम्ही दर महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणार आहोत. आज कॅबिनेटने ते मंजूर केला आहे.. यासाठी महिलांना रजिस्ट्रेशन करावे लागेल.. झालं की त्यांच्या खात्यात ते पैसे जमा होतील.दरम्यान या योजनेमुळे दिल्ली सरकारचा खर्च वाढणार नाही तर दिल्ली सरकारची प्रगती होईल असेही ते म्हणाले..