राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ” महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी गेम चेंजर ठरली. या निवडणुकीत भाजपा सर्वात वरचढ पक्ष ठरला.. या विषयात लाडक्या बहिणींचे मोठे योगदान असल्यामुळे आता नागपूरमधील बहिणीने अर्थात या भाजपच्या नेत्या निलीमा बावणे यांनी पक्षाकडे विधानपरिषदवर घेण्याची आग्रही मागणी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीला विधान परिषदेवर संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपा नेत्या नीलिमा बावणे यांना विधानसभेत संधी मिळाली नाही..त्यामुळे आता त्यानीं विधान परिषदेवर दावा करत संधी देण्याची मागणी केली आहे.. गेली अनेक वर्ष भाजप आणि सामाजिक जीवनात काम करत असल्यामुळे दावेदारी प्रबळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना नीलिमा बावणे या प्रस्तावक होत्या.. आता त्या आमदारकीसाठी आग्रही असून त्यांना संधी मिळण्याची आशा आहे.
भाजपा नेत्या नीलिमा बावणे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून सुद्धा त्यांची ओळख निर्माण केली.. त्यांनी मध्य भारतात दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही महिलांसाठीच नाही तर गरजूंसाठी हक्काची पतसंस्था, बँक उभारली. त्याचबरोबर त्यांनी महिलांना स्वालंबी करण्यासाठी प्रयत्न केले.. आता त्यांनी विधान परिषदेवर दावा केला आहे. पक्षाकडे त्यांनी ही आग्रही मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली.. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. नागपूर मधील दक्षिण -पश्चिम मतदारसंघात ही त्यांनी पुन्हा करिष्मा दाखवला.. त्यानंतर आता भाजपा नेत्या नीलिमा बावणे या आता आमदारकीसाठी आग्रही आहेत..आता त्यांना संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.