राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.. हा पराभव आता आघाडीच्या नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला असून काँग्रेसकडून येत्या एक ते दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असल्याचे समजले आहे.. या बैठकीनंतर आघाडीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत देत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सर्व जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील गेल्या काही दिवसापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी आपले पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं होतं.. मात्र वरिष्ठांकडून कोणताही निर्णय आला नसल्याकारणाने आता पुन्हा त्यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पत्रातून केली आहे.. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार का अशी चर्चा रंगू लागली आहे..
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेनंतर नव्या अध्यक्षांशी चाचणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूरला येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..दरम्यान दुसरीकडे त्यांचे प्रदेशाध्यक्ष काढून घेतल जाईल अशी चर्चा सुरू असून काँग्रेसने त्यांची हायकंमांडाकडे तक्रार ही केली असल्याची माहिती समोर आली आहे.. आता यावर काय निर्णय होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी गेल्या चार वर्षापासून जबाबदारी सांभाळली.. त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता मला या सर्व जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केले आहे.. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची भूमिका ही त्यांनी या पत्रातून मांडले आहे.. आता हाय कमांड यावर काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..