राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर बैठका सुरू होत्या.. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं..आता याबाबतची माहिती समोर आली उद्या रविवारी 15 डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.. यावेळी सुमारे 30 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाले आहे.. त्यामुळे उद्याच्यां होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्य विधिमंडळाचं आठवडाभर चालणार हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबर पासून महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात सुरू होणार आहे.. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.. महाराष्ट्रातील या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात.. त्यामुळे नागपुरात जोरदार तयारी सुरू झाली आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली.. त्यामुळे महायुतीत भाजपच मोठा पक्ष ठरला.. आता या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजपकडे 22 मंत्रिपदे असणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह खातं हे भाजपकडेच असणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेला या खात्यावर पाणी सोडावं लागणार आहे..
दरम्यान मंत्रिमंडळ विचाराच्या हालचालींना जोरात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बावनकुळेंनी सागर बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झालेत. या दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. त्यानंतर आता रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याचे निश्चित झालं.. या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार हे उद्या स्पष्ट दिसणार आहे.