राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी होणार आहे.. या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती..अशातच आता शिंदे सरकार मधील शिवसेनेच्या दोन नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळणार नसल्याची माहिती समोर आली.शिंदे सरकार मधील तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या दोघांचां पत्ता कट होणार असल्याचीं माहिती मिळतात या दोघांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र सुरुवातीला त्यांनी भेट नाकारली. मात्र काही वेळानंतर त्यांच्याच चर्चा झाली.. या भेटीनंतर त्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर शिवसेना नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.. यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर,संजय राठोड तसेच शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असलेले आमदार संजय शिरसाठ यांचा समावेश होता.दरम्यान उद्या 15 डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सुमारे 30 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे..
मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी शुक्रवारी पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या या दोन नेत्यांची भेट नाकारली.. दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परताव लागले..त्यानंतर रात्री दोन वाजता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांनी पुन्हा भेट घेतली.. मात्र या भेटीनंतर ही या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली..यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली.. यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. शपथविधी होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता.. त्यानंतर आता प्रतीक्षा संपली असून उद्या रविवारी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे..