राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होऊनही आठवडा उलटून गेला तरी खातेवाटप आणि मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीतील घोळ कायम असल्याच समोर आल आहे. महायुतीत कळीचा मुद्दा असलेल्या गृह खात्यानंतर आता नगरविकास खात्यासोबतच महसूल खात्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण महसूल खाते सोडण्याची भाजपची तयारी नाही. आता या खात्यावरून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असल्याने गृहखातही भाजपकडेच कायम राहणार आहे..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून ग्रह खात्याची मागणी केली होती.. मात्र आता त्यानंतर त्यांनी नगर विकास खात आणि महसूल खात्याचा हट्ट धरला आहे.. मात्र आता सध्या भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना येत्या १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरुन महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रविवारी दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात शपथविधी होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले आहेत.