जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या जळगाव विभागात येत्या १८ जुलै २०२१ रविवार रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात आयोजन तसेच पुढील नियोजन करण्यासाठी शाहीर गणेश अमृतकर प्रदेश महासचिव यांनी शिरसोली येथील साईबाबा मंदिर येथे कलावंतांची मीटिंग घेऊन मार्गदर्शन केले. दरम्यान महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती तर्फे नियुक्त जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाध्यक्ष प्रशांत कोठावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन शिरसोली येथील महाकाली भक्त परिवार ग्रुप कलावंतांनी सत्कार केला.