राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा शिलेदार आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाठ घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. त्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला असताना त्यांची ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याची माहिती समोर आली आहे..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. राजू पाटील आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी गेल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही दारून पराभव झाला..हा पराभव आता जिव्हारी लागला असून मनसेच्या नेत्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे महायुतीत सहभागी होण्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान याआधी
राजू पाटील हे गेल्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव मनसे आमदार होते.मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. अमित ठाकरेंसह मनसेच्या सर्वच शिलेदारांचा पराभव झाला. हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता.
दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारांच्या हालचालींना चांगला जोर आला असून नागपुरात जोरदार तयारी सुरू आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित दादांचे मंत्री शपथ येणार आहेत..