राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चाना उधान आलं होतं.. मात्र विधिमंडळाच्या या अधिवेशनापूर्वी नाना पटोलेंनीं सविस्तर स्पष्टीकरण देत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मी राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. मला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. हा पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. त्यावर उघड चर्चा करण्याचं कारण नाही. असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आणि महाविकास आघाडीचा धुवा उडाला..काँग्रेसचे राज्यात फक्त 16 आमदार निवडून आले आहेत. राज्यात काँग्रेस इतकी खाली आली नाही, हे विजय वडेट्टीवार म्हणाले ते खरं आहे. जनता या धक्क्यातून बाहेर आलेली नाही, असं नानांनी सांगितलं. हा पराभव जिव्हारी लागल्याच्या चर्चा सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.. पूर्णविराम मिळाला असून त्याने राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसची आजवर झालेली ही सर्वात खराब कामगिरी आहे. या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटत आहेत. नाना पटोले यांनी या पराभवाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची सध्या चर्चा सुरु होती. मात्र ही चर्चा आता थांबली आहे..
दरम्यान नाना पटोले विधीमंडळ पक्षाचे नेते होणार अशी चर्चा आहे. त्यावर या प्रकारची चर्चा कुणीही करु शकतो. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असं नाना यांनी सांगितलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी ही जनतेची भावना असल्याचा दावा त्यांनी केला.