(राजमुद्रा मुंबई) मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईत आज उपसमितीची बैठक पार पडली असून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या 15 दिवसांच्या आत या निकालाबाबत अहवाल सादर केला जाईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर मुंबई आज (ता 8) उपसमितीची बैठक पार पडली. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती नेमली जाणार असून मराठा आरक्षणाबाबत पंधरा दिवसांच्या आत विचार करून अहवाल सादर केला जाणार आहे. यासंबंधात पंतप्रधान व राष्ट्रपती यांनाही पत्र देऊन याची माहिती कळवली जाईल. ही समिती मराठा आरक्षणाच्या निकालाचा विस्तृतपणे प्रत्येक विभागाच्या सचिवांशी चर्चा करून अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपला निर्णय अहवाल स्वरूपात सादर केला जाईल अशी माहिती उपसमितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी दिली.