राजमुद्रा : महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी चार वाजता नागपुरात होणार आहे.. यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे एकूण 35 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असून आज सकाळपासून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याकडून मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन लावले जात आहेत.. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सहा नेत्यांना लॉटरी लागली आहे..
उत्तर महाराष्ट्रातून आतापर्यंत सहा नेत्यांना मंत्रिपदासाठी वरिष्ठ नेत्यांच्या कडून फोन गेले आहेत.. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दादा भुसे यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे..दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय मिळवला आहे.. तर जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजय झालेले शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना देखील फोन गेला आहे.. तसेच भाजपचे संकट मोचक आणि जामनेर मतदार संघात विजयी झालेले भाजपचे गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष राहिलेल्या नरहरी झिरवाळ यांना संधी देण्यात येणार आहे..
गिरीश महाजन – भाजप
जयकुमार रावल – भाजप
राधाकृष्ण विखे पाटील – भाजप
दादा भुसे – शिवसेना
गुलाबराव पाटील – शिवसेना
नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांचा पराभव केला.. गिरीश महाजन हें आतापर्यंत सलग सहा वेळा विजयी झाले आहेत..आता सातव्यांदा त्यांनी बाजी मारली आहे.. त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लावली आहे..
जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव करत बाजी मारली.उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा मानला जातो.. या जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा येतात.. या उत्तर महाराष्ट्रातून आतापर्यंत सहा नेत्यांना मंत्रिमंडळासाठी फोन केले आहेत..
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रिपदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे.